ध्वनिप्रदूषणाच्या मुद्दय़ावरून चर्चा डासांवर घसरत पालिका आणि सरकारी वकिलांमध्ये मंगळवारी जुंपली.
गणेशोत्सव व नवरात्रोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या बेकायदा मंडपांची पाहणी करून ती माहिती पुढील कारवाईकरिता पालिका आयुक्तांकडे सोपवण्याची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र कामाचा प्रचंड ताण असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना एका दिवसात मैलोन्मैल पाहणीसाठी फिरणे शक्य नाही. त्यामुळे अपुऱ्या असलेल्या या मनुष्यबळाला पालिका अधिकाऱ्यांची साथ मिळाली तर न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर पाहणी करता येईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम होत नव्हते म्हणून ही जबाबदारी सरकारकडे सोपवण्यात आल्याचे आणि ती पार पाडणे सरकारचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने सुनावले. तेव्हा आदेशांचे पालन केवळ याच कारणामुळे काटेकोरपणे करता येत नसल्याची सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला गेला व पालिका अधिकाऱ्यांनाही या कामी सहकार्य करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यावर आमच्या अधिकाऱ्यांना कामे नाहीत का, असे म्हणत पालिका वकिलांकडून त्याला विरोध करण्यात आला. तसेच मनुष्यबळाची व्यवस्था तुम्हीच करावी असे म्हटले. त्यावर तुमच्याकडे डास व झाडे मोजण्यासाठीही अधिकारी असल्याचा खोचक टोला सरकारी वकिलांनी हाणला. त्याला आमचे अधिकारी काहीही करतील, असे प्रत्युत्तर पालिकेच्या वकिलांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा