लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बुधवार आणि गुरुवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ आणि ‘डी’ विभाग कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १० मे रोजी चंदनवाडी, मरिन लाइन्स येथील महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ विभाग कार्यालयात, तर गुरूवार, ११ मे रोजी ग्रॅन्टरोड येथील ‘डी’ विभाग कार्यालयात दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत दीपक केसरकर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

आणखी वाचा-मुंबईः संशयावरून प्रेयसीवर चाकूने हल्ला, आरोपीचा मित्रावरही हल्ला

शासकीय योजना, प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्र्यांसोबत संबंधित विभागांतील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय, तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.