केंद्रात होऊ घातलेले सत्तांतर लक्षात घेत केंद्र सरकारात मोक्याच्या-महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती मिळावी यासाठी सरकारी बाबूंनी भाजप-सेना नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. सत्तांतराच्या चाहुलीनंतर निष्ठेच्या टोप्या फिरवणाऱ्या या बाबूंनी महिनाभरापासूनच या कसरतीला सुरुवात केली आहे, हे विशेष. केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार जाणार हे निश्चित होताच पंतप्रधान कार्यालयातील काही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी आपली बदली परदेशांमध्ये उच्चायुक्त किंवा तत्सम पदांवर करून घेतली आहे. सुमारे पाच अधिकाऱ्यांनी आपली नियुक्ती परदेशात करून घेतली आहे. तर नवीन सरकारात आपली नियुक्ती सत्तेच्या निकट म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात व्हावी यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी दिल्लीत प्रभाव असलेल्या भाजप-सेना नेत्यांकडे चकरा मारायला सुरुवात केली आहे. राज्यातील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा