खासदार, व आमदार किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांच्याशी सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वर्तन करावे, त्यांना मानसन्मान द्यावा, कार्यालयातील त्यांच्या आगमनाच्या वेळी व परत जाते वेळी त्यांना उभे राहून अभिवादन करावे, अशा सक्त सूचना सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे या संदर्भात मुख्य सचिवांच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सरकारी अधिकारी-कर्मचारी संसद सदस्य व विधिमंडळ सदस्यांशी आदराने वागत नाहीत, अशी आमदारांची तक्रार असते. त्याची दखल घेऊन शासनाने आता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी कशा प्रकारे वर्तन करावे, त्यांचा मान-सन्मान कसा राखावा, यासंबंधीच्या नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
खासदार, आमदार वा अन्य लोकप्रतिनिधी त्यांच्या कामानिमित्त शासकीय कार्यालयाला भेट देतील, त्यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची व सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घ्यावे, शासकीय नियमानुसार शक्य असेल तेवढी त्यांच्या कामकाजात त्यांना मदत करावी. खासदार-आमदार भेटावयास आल्यानंतर व परत जाते वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करावे. दूरध्वनीवरून माहिती विचारल्यास त्यांच्याशी आदराने व सौजन्याने बोलावे. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या वेळेत खासदार-आमदार आले तर, त्यांना प्राधान्याने भेट द्यावी. शासकीय समारंभ, कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात यावे व निमंत्रितांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करावा, अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्याकर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
आमदार-खासदारांशी सौजन्याने वागा, अन्यथा कारवाई
खासदार, व आमदार किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांच्याशी सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वर्तन करावे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-07-2015 at 05:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government employees notice for proper behave with mps mlas