सरकारी रुग्णालयांत चाचण्या, उपचार, शस्त्रक्रियांच्या शुल्कात ११ हजारांपर्यंत वाढ; वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी ५० ते ५०० रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जीवनावश्यक वस्तूंचे भाव आधीच गगनाला भिडले असताना आता सरकारी रुग्णालयांमधील सर्वसामान्य व गरीब रुग्णांची वैद्यकीय सेवा महागली आहे. मधुमेह, कर्करोग, पोटाचे विकार, हृदयरोग, मेंदू-मूत्रपिंड विकार, मज्जातंतू-नेत्रविकार इत्यादी आजारांशी संबंधित विविध प्रकारच्या चाचण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांचे शुल्क एक हजारांपासून ते ११ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. बाह्य़रुग्ण व आंतररुग्ण नोंदणी शुल्क, रुग्णांना देण्यात येणारे भोजन, नर्सिग होम आदींची शुल्क आकारणीही वाढविण्यात आली आहे. ही दरवाढ सोमवारपासून काही रुग्णालयांमध्ये लागू करण्यात आली.

राज्यात शासकीय वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित २० रुग्णालये आहेत. त्यात चार दंत महाविद्यालये व रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबईतील जेजे, सेंट जॉर्जेस, जी.टी. कामा या रुग्णालयांचा तसेच दंतचिकित्सा रुग्णालयाचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सोलापूर, लातूर, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, मिरज येथे सरकारी रुग्णालये आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या रुग्णालयांमधील शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन आदेश २० नोव्हेंबर रोजी जारी केला असला तरी सोमवारपासून त्याची अंमलबजावणी काही रुग्णालयांमधून करण्यात आली.

यापुढे  शवविच्छेदनासाठी २२०० ते ३७०० रुपये आकारले जाणार आहेत. रुग्णवाहिकाचे भाडे २० रुपये प्रती किलोमीटर या दराने आकारले जाणार आहे. नर्सिग होमचे दरही प्रतिदिन ३०० ते २००० रुपये करण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयांत वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी ५० ते २०० रुपये आकारले जाणार आहेत. अपंगत्वाच्या दाखल्यासाठी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. हृदयरोगाशी संबंधित चाचण्यांसाठी १२५ ते ५०० रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे. एंजिओग्राफी ३२०० रुपये एंजिओप्लास्टीसाठी ४००० रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे. पोटाच्या विकाराशी संबंधित चाचण्या, उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी २२० ते ११०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. एमआरआय चाचणीसाठी २००० ते ३००० रुपये मोजावे लागणार आहेत. जॉइंट रिप्लेसमेंटसाठी ८००० रुपये, रेडिओथेरपीचे (रेडिएशन ऑन्कॉलॉजी), कोबाल्ट थेरपीचे दर ३००० ते ५००० करण्यात आले आहेत. विविध आजारांच्या चाचण्या, उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी भरावयाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. शिवाय उपचार-शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे, उपकरणे व इतर साहित्य हे रुग्णांना बाहेरून खरेदी करून आणून द्यावे लागते, त्याचे वेगळेच पैसे त्यांना मोजावे लागतात. त्यामुळे सरकारी रुग्णालयांतील उपचाराचा खर्च सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबोहर गेला आहे.

शासकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयांतील उपचार, तपासण्या करण्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे, त्यांची देखभाल व दुरुस्ती यासाठी येणारा खर्च, यामुळे सहा वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने म्हटले आहे.

महत्त्वाच्या सेवांची शुल्कवाढ

मुंबईतील जेजे, सेंट जॉर्जेस, दंतचिकित्सा रुग्णालयांत बाह्य़ रुग्ण विभागात तपासणीसाठी नोंदणी शुल्क १० रुपये होते. ते सोमवारपासून २० रुपये करण्यात आले. बालकांच्या आजाराच्या चाचण्या व लहान शस्त्रक्रियेचे शुल्क ३५० ते ११०० रुपये करण्यात आले. विविध आजारांशी संबंधित रक्त चाचण्यांचे शुल्क २५० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ३५०० ते ११००० रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागणार आहे. सोनोग्राफीचे शुल्क १२० ते ६०० रुपये करण्यात आले आहे. सीटी स्कॅनसाठी ३५० ते १७०० रुपये आकारले जाणार आहेत. मज्जातंतूशी संबंधित आजाराच्या चाचण्यांसाठी २०० रुपये ते ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.