राज्य शासनाने आधीची १४ नोव्हेंबरची मोहरम सणाची सुटी रद्द करुन ती १५ नोव्हेंबरला जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या वतीने ५ डिसेंबर २०१२ ला अधिसूचना काढून मोहरमसाठी १४ नोव्हेंबरला सुटी जाहीर केली होती. त्यात बदल करुन १५ ला आता सर्व शासकीय, निमशासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
परीक्षांची तारीख बदलली
विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू असून मोहरमची सुटी १४ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केल्यामुळे त्या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या नव्या तारखा बुधवारी जाहीर केल्या जातील असे, विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

Story img Loader