मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील तपास बंद करण्यात आल्यावर त्यांनी पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात म्हणून केंद्र सरकारमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिणामी त्यांना महासंचालकपदावर त्या पात्र ठरल्या नव्हत्या. राज्य सरकारने अभय दिल्यावर शुक्ला यांनी केंद्रात पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रात पोलीस महासंचालकपदाकरिता पात्र ठरल्यावर त्या राज्याच्या सेवेत पोलीस महासंचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुल्का यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार अशी चर्चा आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने चौकशीतून अभय दिल्याने त्यांचा राज्याच्या सेवेत परत येऊन महत्त्वाचे पद धारण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government rashmi shukla striving for the post director general of police centre ysh