राज्यातील दुष्काळग्रस्त भागातून मुंबई वा पुण्यात स्थलांतर झालेले नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.
दुष्काळग्रस्त भागातून मुंबई, पुण्यात स्थलांतर होत असल्याबाबत हेमंत टकले, विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दुष्काळग्रस्त भागातून स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी मुंबई, पुण्यात काय व्यवस्था केली आहे, असा सवालही त्यांनी केला.
मात्र, दुष्काळग्रस्त भागातून मुंबई, पुण्यात स्थलांतर झालेले नाही, असे कदम यांनी लेखी उत्तरात नमूद केले.

Story img Loader