Governor Bhagat Singh Koshyari corona positive : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाली आहे. राज्यपालांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ८० वर्षीय कोश्यारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज सकाळीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यांच वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरुन राजकीय संघर्ष सुरु असून राज्यपाल सुद्धा या घडामोडींच्या केंद्रस्थानी असतानाच त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. करोनाचा संसर्ग झाल्याने राज्यपाल पुढील काही दिवस कोणालाही भेटू शकणार नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच आता सत्तास्थापनाचे दावे प्रतिदावे हे राजभवनापर्यंत पोहचण्यास आणि त्यासंदर्भातील निर्यणांना विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

आजच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सुरतहून गुवहाटीला पोहचले असून आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा त्यांनी केलाय. यात शिवसेनेचे ३३ आमदार असून सात अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काल सायंकाळी शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंदरम्यान चर्चा झाली. मात्र त्यानंतरही मध्यरात्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीला गेल्याने ही चर्चा फिस्कटल्याचं सांगितलं जात आहे.