मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा…’, ‘बोल बजरंग बली की जय’ असा जयघोष करीत मुंबईसह राज्यभर दहीहंडी उत्सवाचा उत्साह द्विगुणीत होत असतानाच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. जलधारा अंगावर झेलत आणि मैदानातील चिखलाची पर्वा न करता गोविंदा पथकांतील गोविंदा उंचच मानवी मनोरे रचण्यात मग्न होते.

पावसाच्या धारा अंगावर झेलत काही गोविंदा पायी चालत दहीहंडी उत्सवस्थळी मार्गस्थ होत होते, तर काही गोविंदा दुचाकीवरून मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्यांचा शोध घेत संचार करीत होते. दरम्यान, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि ढोल-ताशा, बेन्जो, कच्छी बाजाच्या तालावर पावसात भिजत तरूणाई थिरकू लागली. तसेच दहीहंडी उत्सवस्थली मैदानांमध्ये चिखल झाला होता. या चिखलातून वाट काढत गोविंदा पुढे जात होते. मुसळधार पावसाच्या धारा आणि चिखलामुळे गोविंदा पथकांना मानवी मनोरे रचताना अडचणी येत होत्या. मात्र या अडचणींवर मात करीत गोविंदा मानवी मनोरे रचत होते. मानवी मनोऱ्यांचा हा रोमहर्षक थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी हातात छत्री घेऊन ठिकठिकाणी गर्दी केली आहे.

Diwali festival, celebration, relationship, family
दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
sangli district assembly election
सांगली जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना; मिरज, खानापूरमध्ये जागेवरून तर सांगलीत उमेदवारीवरून वाद
Jayashree Patil held a meeting of the workers and warned of rebellion if he did not get the nomination sangli news
सांगलीत भाजपमध्ये नाराजी तर काँग्रेसमध्ये बंडखोरीचा इशारा
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त
achalpur assembly constituency
अचलपूरच्‍या भाजप उमेदवाराविरोधात पक्षाअंतर्गत सामूहिक बंड; ‘डमी’ उमेदवार दिल्‍याचा आरोप

हेही वाचा >>>गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार

भाजपतर्फे वरळीतील जांबोरी मैदानात परिवर्तन दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची मानाची दहीहंडी बांधण्यात आली असून भाजपच्या संतोष पांडे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन केले आहे. तर शिवडी विधानसभेतर्फे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकीमधील अभ्युद्यनगर येथील शहीद भगतसिंग मैदानात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे वरळीतील जांबोरी मैदानात चिखल झाला, मात्र मुसळधार पावसाच्या साथीने गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचले. तर मैदानात मॅट नसल्यामुळे गोविंदा पथकांची गैरसोय झालीहे. तर काही गोविंदा पथकांना तासन््तास उभे राहावे लागत असल्यामुळे गोविंदा नाराजी व्यक्त करीत होते.