राम नाईक यांचा ‘चरैवेति.चरैवेति’आत्मचरित्रात दावा
२००४ साली उत्तर मुंबई मतदासंघात गोिवदाकडून ११ हजार मतांनी स्वीकारावा लागलेला पराभव मी पचवू शकलो नव्हतो.२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अभिनेता गोिवदा याने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेंद्र ठाकूर यांची मदत घेतल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केला आहे. नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति.चरैवेति’ या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. मागील आठवडय़ात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. राजकीय नेत्यांच्या जुगलबंदीमुळे हा सोहळा चांगलाच गाजला होता. दरम्यान, आज विविध वृत्तवाहिन्यांवरून या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यामुळे ‘चरैवेति.चरैवेति’ हे पुस्तक पुन्हा एकदा चच्रेत आले आहे.
गोिवदाने दहशतीने मतदारांची मते आपल्या बाजूला वळविण्यासाठी या दोघांचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप राम नाईक यांनी पुस्तकात केला आहे. दरम्यान, गोिवदाने हे सर्व आरोप फेटाळले असून, मला जनतेने विजयी केल्याचे सांगितले. आता मी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असताना, नाईक यांनी माझे नाव खराब करू नये, असे गोिवदाने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती!
२००४ साली उत्तर मुंबई मतदासंघात गोिवदाकडून ११ हजार मतांनी स्वीकारावा लागलेला पराभव मी पचवू शकलो नव्हतो.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 04-05-2016 at 01:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda took dawoods help to defeat me in 2004 says ram naik