संभाजी भिडे हे राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतात. संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्यांचा आजच बंदोबस्त करावा आणि त्याबाबत सभागृहत निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “संभाजी भिडे हे विकृती आहेत. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत अवमानकारण विधान केलं आहे, जे देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार वादग्रस्त विधाने करतात. त्यांना पाठीशी घालणाऱ्याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे, हे ओळखलं पाहिजे.”

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

हेही वाचा : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

“कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

“पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती,” असं थोरात यांनी म्हटलं.

हेही वाचा : राष्ट्रवादीचा दुसरा गट महायुतीत येईल? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र…”

“या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडेंसारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली, तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हणलं जाईल,” असेही थोरात म्हणाले.