मुंबई : राज्यात गेली सव्वा वर्ष सत्तेवर असलेले घटनाबाह्य सरकार हे प्रत्येक विभागातील भ्रष्टाचाराची मजा घेत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील काही भागात दुष्काळजन्य स्थिती आहे. गुन्हेगारी आलेख वाढू लागला आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. अशा विदारक परस्थितीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, काही मंत्री हे परदेश दौऱ्यात मग्न आहेत. हे परदेश दौरे म्हणजे सहली आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जर्मनी व ब्रिटन दौऱ्यावर टीका केल्यानंतर हा दौरा त्यांना रद्द करावा लागला.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही परदेश दौऱ्यावर जाणे टाळले आहे. राज्यात लोकशाहीची हत्या केली जात असताना ते घाना येथील राष्ट्रकूल परिषदेत जाऊन काय सांगणार होते, असा सवाल ठाकरे यांनी केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यातील खर्चावरही ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. पाहणी दौऱ्याच्या नावाखाली सहली केल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा खर्च  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केला आहे. जपान दौऱ्याचा अहवाल कुठे आहे. उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही ४९ सदस्यांसह दौरे केले  आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर २८ तासासाठी ४८ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. जनतेच्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी केली जात असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

मुख्यमंत्री शिंदे जर्मनी, लंडन येथे जाऊन करणार काय होते असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तीस मिनिटांत हा दौरा रद्द करावा लागला. राज्यात लोकशाहीची हत्या केली जात असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाना येथे जाऊन लोकशाहीवर बोलणार होते. घानाला जाऊन त्यांनी देशाची बदनामी करू नये असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनाही हा दौरा रद्द करावा लागला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत ब्रिटनला ३ ऑक्टोबरला जात आहेत. त्या ठिकाणी त्यांची बैठक होणार असून कोणत्या कंपनीबरोबर बैठक होणार हे स्पष्ट नाही. आम्हीही दौरे केले पण तेथील प्रत्येक बैठकींचा इतिवृत्तात समाज माध्यमांवर मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांची वाघनखे आणण्यासाठी इग्लडला एक मंत्री जाणार आहेत मात्र ही वाघनखे उसणवारी आणली जाणार आहेत की कायम स्वरूपी परत आणली जाणार आहेत ते सरकारने स्पष्ट करावे. महाराजांच्या वाघनखांविषयी सरकारने खोटे बोलून जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

फडणवीस यांच्या दौऱ्याचा खर्च जपान सरकारकडून- शेलार 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च जपान सरकारने केला. या दौऱ्यात मोठी आर्थिक गुंतवणूक राज्यात आली असून त्याचा तपशील फडणवीस यांच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याचे प्रत्युत्तर मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिले. राज्य सरकारने केवळ फडणवीस यांच्या बरोबर गेलेल्या अधिकाऱ्यांचा खर्च केला आहे. वडील आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचा नसतो, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

Story img Loader