मुंबई : गेले महिनाभर सुरू असलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही आंतरराज्य महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आठ वेगवेगळ्या विभागांतून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एकांकिकांमधली चुरशीची स्पर्धा आणि त्यातून महाराष्ट्राच्या ‘लोकसत्ता लोकांकिके’ची निवड हा निर्णायक क्षण अनुभवण्यासाठी रसिक उत्सुक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरराज्य महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शनिवार, २१ डिसेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात रंगणार आहे. शनिवारी, सकाळी पावणेदहापासून महाअंतिम सोहळा सुरू होईल. या सोहळ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाअंतिम फेरीत ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा बहुमान पटकावण्याबरोबरच अभिनयासह विविध विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पंकज त्रिपाठी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सायबर हल्ले रोखण्यासाठी ‘डीआरडीओ’ सज्ज – डॉ. समीर कामत

सर्वांना प्रवेश; काही जागा निमंत्रितांसाठी राखीव

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजल्यापासून माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. महाअंतिम फेरी सुरू होण्याच्या अर्धा तास आधी यशवंत नाट्य मंदिर येथेच रसिक प्रेक्षकांना नि:शुल्क प्रवेशिका देण्यात येतील. एका व्यक्तीला एकच प्रवेशिका देण्यात येईल, तर काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand finale of loksatta lokankika one act drama competition mumbai news amy