आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडण्यात अपयश आल्याने ग्रीसवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. ग्रीसने आर्थिक सुधारणांची मागणी फेटाळून लावली तर २० जुलैला होणाऱ्या युरोझोनच्या बैठकीत हा देश दिवाळखोर जाहीर केला जाईल. शिवाय युरोझोनमधूनही बाहेर फेकला जाईल. त्यामुळे दिवाळखोरीत निघणारा २१ व्या शतकातील तो पहिलाच देश ठरेल. दरम्यान, रविवारी ग्रीसने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधातही मतदान केले आहे.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांच्या यादीत आघाडीवर असलेल्या भारतावर या संकटाचा परिणाम होणार का? झाला तर तो किती आणि कसा? भारतीय शेअर बाजार त्यामुळे खरंच कोसळेल का? भारतीय कंपन्यांच्या उत्पन्नात आणि वाढीवर त्याचा परिणाम होईल? हे असे अनेक प्रश्न लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करणा-या तरूण विद्यार्थ्यांना याबाबत विशेष कुतूहल आहे. त्यामुळे हा विषय नेमका काय आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असतील हे अतिशय सोप्या शब्दांत समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता’ तुम्हाला देत आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक आणि अर्थतज्ज्ञ गिरीश कुबेर लाइव्ह ‘फेसबुक चॅट’च्या माध्यमातून ‘ग्रीस’संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा