मुंबई : बेस्ट उपक्रमाला ‘ऊर्जा संक्रमण – मार्ग प्रकाश विद्युतीकरणमधील शहरी स्थानिक संस्था उत्कृष्टता पुरस्कार’ या श्रेणीअंतर्गत ‘पाचवा हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार मिळाला आहे.

भारत सरकारचे माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे (पीएनजीआरबी) अध्यक्ष अनिलकुमार जैन यांच्या हस्ते नुकताच चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीतील डिझायर हॉल, ले मेरिडियन येथे झालेल्या १३ व्या हरित ऊर्जा शिखर परिषदेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बेस्ट उपक्रमाच्या विद्युतपुरवठा विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक बिलाल शेख आणि मुख्य अभियंता (नियोजन) सुरेश मकवाना यांनी चषक आणि प्रमाणपत्र स्वीकारले. पुरस्कार समारंभ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केला होता.

Story img Loader