तांत्रिक बिघाड, मेगाब्लॉक यांसारख्या कारणांमुळे लोकल ट्रेन्सला होणारा उशीर हा आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडला आहे. परंतु, मुंबईकरांच्या औत्स्युकाचा विषय असणारी मेट्रो रेल्वेलासुद्धा पहिल्याच दिवशी या समस्येचा सामना करावा लागला. मुंबई-वर्सोवा या पहिल्या टप्प्यातील मेट्रो रेल्वेचे आज (रविवार) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी अनेक मंत्री, खासदार, आमदार, पत्रकार, अधिकाऱ्यांनी पहिल्या मेट्रो सफरीची मजा अनुभवली. हा सगळा लवाजमा घेऊन, बरोब्बर २१ मिनिटांत मेट्रो घाटकोपरला पोहोचली, तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.
मेट्रो रेल्वे दुपारी एक वाजल्यापासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू करण्यात आली. त्यानंतर मेट्रोच्या पहिल्या प्रवासाचे स्वप्न उराशी बाळगत अनेक मुंबईकर मेट्रोत दाखल झाले. परंतु, पहिल्याच फेरीत तिचा खोळंबा झाला आणि मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले. मुख्यमंत्र्यांना घेऊन घाटकोपरला पोहोचलेली मेट्रो दुपारी एक वाजता प्रवाशांना घेऊन निघाली आणि जवळच्याच जागृती नगर स्टेशनावर बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे आपली गाडी बंद पडल्याचं कळल्यावर सगळेच वैतागले. त्यामुळे मेट्रो रेल्वेसुद्धा आता लोकल ट्रेन्सचा कित्ता गिरवणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेट्रोच्या मार्गात पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडाचा खो!
तांत्रिक बिघाड, मेगाब्लॉक यांसारख्या कारणांमुळे लोकल ट्रेन्सला होणारा उशीर हा आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडला आहे. परंतु, मुंबईकरांच्या औत्स्युकाचा विषय असणारी मेट्रो रेल्वेलासुद्धा पहिल्याच दिवशी या समस्येचा सामना करावा लागला.
First published on: 08-06-2014 at 10:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green flag to mumbai metro by cm prithviraj chavan