मुंबई : २३७ कोटी रुपयांचे बनावट व्यवहार दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) विभागाने झवेरी बाजारमधील कंपनीच्या भागीदाराला नुकतीच अटक केली. तंत्रज्ञानाच्या मदतीने सखोल तपासणी करून जीएसटी विभागाने या फसवणुकीचा शोध लावला. आरोपीने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बनावट व्यवहार दाखवून सात कोटी रुपयांचा कर परतावा मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कागदोपत्री व्यवहार दाखवून त्याच्या माध्यमातून कोटय़वधींचा कर परतावा मिळवणाऱ्या व्यावसायिकांबाबत केंद्रीय जीएसटी विभाग तपास करत आहे. त्यावेळी झवेरी बाजार येथील मे. ऋषभ बुलीयन या कंपनीने २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षांत सात कोटी ११ लाख रुपये मिळवलेला कर परतावा प्राथमिक पाहणीत संशयास्पद  वाटला. त्यामुळे जीएसटी विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याबाबत सखोल तपास केला. त्यावेळी या कंपनीने व्यवहार केलेल्या वर्सोवा येथील गोल्डमाईन बुलीयन व चिंचबंदर येथील रिद्धी सिद्धी गोल्ड यांच्या सोबतच्या व्यवहारांचीही जीएसटी विभागाने पडताळणी केली. त्यावेळी प्रत्यक्षात कोणत्याही मालाची देवाण-घेवाण न करता केवळ कागदपत्रांवर गोल्डमाईन बुलीयनसोबत १६३ कोटी रुपयांचे व रिद्धी सिद्धी गोल्डसोबत ७४ कोटी रुपयांचे व्यवहार दाखविण्यात आल्याचे उघड झाले. अखेर जीएसटी विभागाने कंपनीचे व्यवहार पाहणारे भागीदार जीतेंद्र धाकड यांना अटक करण्यात आली आह़े