मुंबई : दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. भूमिगत बाजार सुरू करून त्यात फेरीवाल्यांना जागा देण्याचे ठरवण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोकळ्या भूखंडांच्या खाली हे भूमिगत बाजार सुरू करण्यात येईल. त्यासाठी दोन जागांची निवड करण्यात आली होती. त्यात दादर टीटी व शीव परिसरातील जागेची निवड केली होती. मात्र, अद्याप या दोन जागांवर भूमिगत बाजार सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल संबंधित अधिकाऱ्यांनी न केल्यामुळे केसरकर यांनी कारवाईचा इशारा दिला. दर आठवड्याला मुख्यालयात येऊन केसरकर आढावा बैठक घेत आहेत.

हेही वाचा >>>गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार

अधिकाऱ्यांमध्ये तणाव

भूमिगत बाजारविषयात काहीच प्रगती न झाल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला. त्यांनी शुक्रवारी मुंबई व ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली. त्यातच बाजारविषयाच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईचा इशारा दिल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.