मुंबई : कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्याकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या? शैक्षणिक प्रवासातील विशिष्ट टप्प्यांनंतर पुढे काय करायचे, नवनवीन अभ्यासक्रम व सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, याबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात कौशल्य विकास क्षेत्र कशाप्रकारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, विविध उद्याोगांना कोणकोणत्या कौशल्यांची आवश्यकता भासत आहे, या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी कोणत्या? याबाबतही जाणून घेता येणार आहे. तसेच परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींची ओळख आणि प्रवेशप्रक्रियेसंबंधित विविध प्रश्नांची उत्तरेही ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत मिळणार आहेत. माटुंगा पश्चिमेकडील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल.
परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधि
कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्याकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या? शैक्षणिक प्रवासातील विशिष्ट टप्प्यांनंतर पुढे काय करायचे, नवनवीन अभ्यासक्रम व सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, याबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-05-2024 at 05:11 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance on higher education opportunities abroad skill development mumbai amy