मुंबई : ताणतणावाचे नियोजन, ‘नव्या वाटा’ सत्राअंतर्गत युट्यूब / समाजमाध्यमे, वित्त क्षेत्रातील संधी, ‘एआय’ – कृत्रिम बुद्धिमत्ता, विविध क्षेत्रांतील संधी, कौशल्य विकास, परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, कला क्षेत्रापासून विधी क्षेत्रांपर्यंत कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आदी विषयांबाबत इत्यंभूत माहिती देणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेला मुंबईत विद्यार्थ्यांसह पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईपाठोपाठ आता येत्या ८ व ९ जून रोजी ही कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी आणि विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी कोणत्या ? याबाबत विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

हेही वाचा – दुसऱ्या दिवशीही रुग्णसेवा सुरळीत, द्राविडीप्राणायाम करीत कर्मचारी रुग्णालयात दाखल

दहावी-बारावीच्या निकालानंतर नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. तसेच विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबतही अनेकजण अनभिज्ञ असतात. अनेक विद्यार्थी निकालाची टक्केवारी व बदलत्या काळातील कल ओळखून अभ्यासक्रमाची निवड करतात. परंतु अभ्यासक्रमाची निवड कशा पद्धतीने करावी आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांत कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, वैद्यकीय पुरक अभ्यासक्रम, विविध पदविका अभ्यासक्रम, कौशल्य विकास, विधि अशा विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, नामांकित महाविद्यालये, भविष्यातील रोजगाराच्या संधी आदी गोष्टींबाबत विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणार आहेत.

विद्यार्थीदशेत ताणतणावाला सामोरे कसे जावे याबाबत ८ जून रोजी डॉ. हरीश शेट्टी व ९ जून रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. ‘नव्या वाटा’ सत्राअंतर्गत युट्यूब – समाजमाध्यमे या विषयावर केतन जोशी, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि ‘एआय’ – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रतिनिधी पंकज तावडे कौशल्य विकास क्षेत्र आणि त्यामधील विविध संधींचा मागोवा घेणार आहेत. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन व तरंग अग्रवाल मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा – मेमध्ये मुंबईतील १२००० घरांची विक्री

विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीची दिशा सुस्पष्ट करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ऑनलाइन व प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्याचा पर्यायही उपलब्ध करण्यात आला आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधी ?

शनिवार, ८ जून आणि रविवार, ९ जून रोजी

कुठे ?

हॉटेल टीप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम)

केव्हा ?

सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

८ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_8june

९ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_9june

प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या प्रवेशिका ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीनेही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ठाणे पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा आणि नौपाडा येथील गोखले मार्गावरील जीन्स जंक्शन येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध असतील.

मुख्य प्रायोजक – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक – सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन्स अकॅडमी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लीला एज्युकेशन सोसायटी आचार्य इन्स्टिट्यूशन्स, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे</p>

बँकिंग पार्टनर – युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय – ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, भारत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कान्होर, बदलापूर (प.), विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, शौर्य डिफेन्स अकॅडमी, ठाणे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance regarding various courses and career opportunities after 10th 12th fortune telling of career opportunities on 8th and 9th june in thane ssb