चित्रीकरण करणाऱ्या निर्मिती संस्थांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसर स्वच्छ – सुंदर ठेवावी यासाठी ‘स्वच्छतेची मार्गदर्शक नियमावली’ जाहीर करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> एमएमआरडीएचा पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत कार्यरत असणारी ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ स्वच्छ ठेवण्यासाठी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘स्वच्छतेची मार्गदर्शक नियमावली’ जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार निर्मिती संस्थांनी चित्रीकरण स्थळांवरील हिरव्या व निळ्या रंगाच्या कचरा कुंडीमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ठेवावा, वापरलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या – इतर प्लास्टिक व पुन्हा वापरण्यायोग्य नसलेले लाकूड, बांबू, तार, लोखंडी साहित्य इत्यादी एकत्रित करून वेगळे ठेवावे, त्याचबरोबर चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर वापरलेली जागा स्वच्छ करून देण्याची जबाबदारी संबंधित निर्मिती संस्थांवर सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मुंबई: पोटनिवडणुका टाळण्याकडे पक्षांचा कल?
चित्रीकरण संपल्यानंतर त्या ठिकाणचे छायाचित्र जीओ टॅग तंत्राने स्टुडिओ विभागाकडे त्याच दिवशी मोबाइल क्रमांक ७७३८८2६१८६ वर व्हॉटस ॲपद्वारे सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. चित्रनगरी परिसरात उपलब्ध असलेल्या स्वच्छ प्रसाधनगृहाचाच वापर करण्याच्या सूचना कलाकार आणि कामगारांना देण्याचे आवाहनही चित्रनगरी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. तसेच कचरा विलगीकरणासाठी आवश्यक (हिरवी, पिवळी, निळी) पिशव्या महामंडळामार्फत मोफत उपलब्ध देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर स्वच्छता नियमावली निर्मिती संस्थांसाठी बंधनकारक असून त्याचे पालन न केल्यास ५ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. चित्रनगरी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनास नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.