पश्चिम रेल्वेच्या उत्तर आणि पूर्व भारतातील काही एक्सप्रेस रद्द; काहींचे मार्ग बदलले
मुंबई : गुज्जर आंदोलनामुळे रेल्वे, आणि प्रवाशांना फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेने उत्तर आणि पूर्व भारतात ये-जा करणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. काहींचे मार्ग बदलले आहेत.
मंगळवारी वांद्रे-देहरादून एक्सप्रेस१९०१९, मुंबई सेंट्रल-फिरोजपूर जनता एक्सप्रेस१९०२३, फिरोजपूर-मुंबईसेंट्रल जनता एक्सप्रेस १९०२४, अमृतसर-वांद्रे टर्मिनन्स पश्चिम एक्सप्रेस१२९२६, वांद्रे-गोरखपूरअवध एक्सप्रेस१९०३७, वलसाड-हावडा एक्सप्रेस१२९११, मडगाव-चंदिगढ गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस१२४४९, इंदूर-नवी दिल्ली एक्सप्रेस१२४१५, गोरखपूर-वांद्रे अंत्योदय एक्सप्रेस२२९२२, माता वैष्णवदेवी कटरा-वांद्रे स्वराज एक्सप्रेस१२४७२, पुणे-हजरत निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस१२२६३ रद्द करण्यात आल्या आहेत.
बुधवारी वांद्रे-देहरादून एक्सप्रेस१९०१९, मुंबई सेंट्रल-फिरोजपूर जनता एक्सप्रेस१९०२३, फिरोजपूर-मुंबईसेंट्रल जनता एक्सप्रेस १९०२४, मडगाव-चंदिगढ गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस१२४४९, इंदूर-नवी दिल्ली एक्सप्रेस१२४१५, मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस १२९५३, वांद्रे-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस १२९०७, वांद्रे-हरिद्वार एक्सप्रेस२२९१७, गोरखपूर-वांद्रे अवध एक्सप्रेस १९०३८, चंदीगढ-कोचीवेल्ली संपर्क क्रांती एक्सप्रेस १२२१८ या रद्द करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी पश्चि एक्सप्रेस(१२९२६), जनता एक्सप्रेस(१९०२४) आणि शुक्रवारी अवध एक्सप्रेस(१९०३८), जनता एक्सप्रेस(१९०२४), गोल्डन टेम्पल एक्सप्रेस(१२९०४), स्वराज एक्सप्रेस(१२४७२) रद्द केल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.
प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि बोरिवली स्थानकात माहिती केंद्र उभारले आहे. प्रवाशांना या बदलांची माहिती लघुसंदेशांद्वारे दिली जाते आहे. रेल्वेच्या १३८ या हेल्पलाईनवर सध्या चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचा पाऊस पडत असल्याने तेथील मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. परताव्यासाठी विशेष खिडक्याही सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
दरम्यान,आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी रेल्वेमार्ग मोकळे करावे आणि चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी पुन्हा एकदा केले. आंदोलकांच्या मागण्यांबाबत जेवढे करणे शक्य आहे ते केले जाईल, असे गेहलोत म्हणाले.