राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर दुपारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं. यावेळी माझ्या जीवाला धोका आहे, असं सदावर्ते म्हणाले होते.

“कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनाबाबत अजित पवारांनी व्यक्त केला संशय; म्हणाले, “मला एका गोष्टीची…!”

“अटकेच्या कोणत्याही प्रक्रियेचं पालन न करता मला अतिरेक्यासारखं पोलीस स्टेशनला आणलं. माझ्या जीवाला धोका आहे. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे माझा खून होऊ शकतो. माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली आहे,” असं गुणरत्न सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हणाले.

जयश्री पाटलांचे आरोप

“हे सगळं शरद पवारांचं वर्तन आहे. माझ्या जीवाला, माझ्या पतीच्या आणि मुलाच्या जीवाला मुंबई पोलिसांकडूनही धोका आहे. शरद पवार मुंबई पोलिसांचा वापर आमच्या जीवाला धोका देण्यासाठी करत आहेत. एफआयआर दाखल नसूनही माझ्या पतीला तुरुंगात बंद करून ठेवलंय,” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला.  

Story img Loader