किरकोळ भांडणातून झालेल्या वादाचे पर्यवसान चार अज्ञात तरुणांनी एकावर गोळीबार करण्यात झाले. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री धावत्या उपनगरीय गाडीत नाहूर येथे घडला. या घटनेत तबरेज जेठवा (२६) हा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तबरेज हा वांद्रे येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे वाहनचालक म्हणून नोकरी करतो. मुंब्रा येथे राहणाऱ्या तबरेजने दादर येथे शुक्रवारी रात्री अंबरनाथ गाडी पकडली. मालडब्यात तो बसला असताना विक्रोळी स्थानकात चढलेल्या चार तरुणांपैकी एकाचा पाय त्याला लागला. त्यामुळे दोघांत वाद झाला. नाहूर रेल्वेस्थानक जवळ येत असताना चौघांपैकी एकाने आपल्याजवळील गावठी कट्टय़ाने तबरेजच्या दिशेने गोळय़ा झाडल्या. त्याच्या उजव्या मनगटाला व खांद्याला जखमा झाल्या आहेत. डब्यातील सहप्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविण्याचा तसेच या चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोर पळून गेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा