शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महापालिकेतील सत्ता असल्यामुळे मुंबई महापालिकेतून सेनेची सत्ता उखडण्याचे काम मुंबई भाजपने हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते व माजी नगरसेवक समीर देसाई यांना रविवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचे नातेवाईक असून मुंबई भाजपच्या सचिवपदी त्यांची तात्काळ नियुक्तीही करण्यात आली.
मुंबईतील शिवसेनेची ताकद असलेल्या प्रत्येक विभागातून भाजपमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन सेनेच्या ताकदीचे खच्चीकरण करण्याची योजना भाजपने आखली आहे. गोरेगावमध्ये सेनेचे माजी आमदार व नेते सुभाष देसाई यांचा भाजपने पराभव केल्यानंतर गोरेगावमध्ये राहणारे समीर देसाई यांना रविवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी राज्यमंत्री विद्या ठाकूर, नगरसेवक दिलीप पटेल यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये दहा वर्षे कार्यरत असलेले देसाई हे काँग्रेसच्या तिकीटावर दोनवेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा