आयपीएलमधील सट्टेबाजीच्या रॅकेटप्रकरणी अटकेत असलेला चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन, अभिनेता विंदू दारा सिंग, सट्टेबाजांचा आर्थिक व्यवहार करणारे अल्पेशकुमार पटेल आणि प्रेम तनेजा यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबईतील महानगरदंडाधिकाऱयांनी सोमवारी राखून ठेवला. त्यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी निर्णय देण्याचे जाहीर केले.
या चारही आरोपींना सोमवारी सकाळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील महानगरदंडाधिकाऱयांनी या चौघांना १४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मयप्पन, विंदू दारा सिंग, पटेल आणि तनेजा यांची पोलिस कोठडी सोमवारी संपणार असल्याने त्यांना सकाळी महानगरदंडाधिकाऱयांकडे हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.
मयप्पन, विंदू दारा सिंगच्या जामीनावर मंगळवारी निर्णय
जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी निर्णय देण्याचे जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-06-2013 at 04:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurunath meiyappan vindoo dara singh remanded to judicial custody