मागील दोन महिन्यांत ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध भागांमधून जप्त करण्यात आलेला सुमारे तीन लाख नऊ हजार रुपयांचा ५३१ किलोचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी दुपारी मानखुर्द भागात जाळून नष्ट केला.मुंब्रा, अंबरनाथ, वसई, भिवंडी या भागांमध्ये धाडी टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा जप्त करण्याची कारवाई केली होती. यामध्ये मागील दोन महिन्यांत सुमारे ५३१ किलोचा गुटखा पथकाने जप्त केला होता. त्यात नामांकित कंपन्यांचा गुटख्याचा समावेश होता.  मानखुर्द येथील एस.एम.एस इन्व्हो क्लीन कंपनीत हा गुटखा नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त एस. के. शेरे यांनी दिली.   

Story img Loader