मागील दोन महिन्यांत ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध भागांमधून जप्त करण्यात आलेला सुमारे तीन लाख नऊ हजार रुपयांचा ५३१ किलोचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी दुपारी मानखुर्द भागात जाळून नष्ट केला.मुंब्रा, अंबरनाथ, वसई, भिवंडी या भागांमध्ये धाडी टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा जप्त करण्याची कारवाई केली होती. यामध्ये मागील दोन महिन्यांत सुमारे ५३१ किलोचा गुटखा पथकाने जप्त केला होता. त्यात नामांकित कंपन्यांचा गुटख्याचा समावेश होता. मानखुर्द येथील एस.एम.एस इन्व्हो क्लीन कंपनीत हा गुटखा नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त एस. के. शेरे यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा