आठवडय़ाची मुलाखत : डॉ. रेखा डावर

जे.जे. रुग्णालय, स्त्री रोग विभागाच्या माजी विभाग प्रमुख

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका

मुंबईत २०१० मध्ये १६.७ टक्के असलेले ‘सिझेरियन’चे प्रमाण गेल्या ५ वर्षांत म्हणजे २०१५ पर्यंत ३२.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याचे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे. सध्या वयाच्या पस्तिशीनंतर गर्भधारणा, अधिक काळ प्रसववेदना सहन न होणे यामुळे गर्भवती महिला, तर पैसे कमावण्याच्या इच्छेने खासगी रुग्णालये ‘सिझेरियन’ प्रसूतीला प्राधान्य देतात. मात्र, याचा मोठा धोका संबंधित महिलांना भविष्यात सोसावा लागू शकतो. या पाश्र्वभूमीवर ‘सिझेरियन’बद्दलचे समज-अपसमज, उपयुक्तता आणि धोके जाणून घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या स्त्री रोग विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. रेखा डावर यांच्याशी साधलेला संवाद.

* प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया वाढण्याची कारणे काय?

प्रसूतीदरम्यान गुंतागुंत असेल तर नाइलाजाने सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते. प्रसूतीसाठी सिझेरियन ही वाईट शस्त्रक्रिया नाही, मात्र सध्या त्याचा दुरुपयोग होत आहे. यासाठी डॉक्टर, खासगी रुग्णालयांबरोबर महिलाही तितक्याच जबाबदार आहेत. नसíगक प्रसूतीदरम्यान महिलेला असह्य़ प्रसववेदना सहन कराव्या लागतात. अनेकदा या वेदना ८ ते ९ तासही येत असतात. हा त्रास सहन न होण्याचे कारण पुढे करीत महिला सुरुवातीलाच सिझेरियन शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, तर दुसरे कारण म्हणजे मुहूर्तावर मूल व्हावे असे ठरवून आलेले पालक नसíगक प्रसूतीची वाट न पाहता सिझेरियन करतात. गर्भधारणेच्या नऊ महिन्यांत व्यायामाचा अभाव व आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम प्रसूतीदरम्यान होतो.

* महिलांना नसíगक प्रसूतीसंदर्भात समुपदेशन देण्याची गरज का वाटते?

नैसर्गिक प्रसूतीबाबत महिलांमध्ये बरेच गरसमज आहे. यामध्ये चित्रपट आणि मालिका बऱ्याच अंशी जबाबदार आहे. चित्रपटात ज्या पद्धतीने प्रसूत महिलेचे चित्रण केले जाते ते भीती निर्माण करणारे आहे. त्यामुळे नसíगक प्रसूती ही सहज आणि सोपी आहे याबाबत महिलांमध्ये समुपदेशन होणे आवश्यक आहे. स्त्री रोगतज्ज्ञांनी नसíगक प्रसूतीसाठी आवश्यक व्यायाम, आहार याची माहिती द्यावी. प्रसवकळांना न घाबरता त्यांचा स्वीकार करा आणि त्यांचा आनंद घ्यावयास हवा. मुलाच्या बळकटीसाठी प्रसवकळा आनंदाने स्वीकारा. महिलांनी मनातील भीती कमी केली तर वैद्यकीय गुंतागुतीच्या कारणाशिवाय नसíगक प्रसूतीच योग्य आहे. यात खासगी रुग्णालयांची जबाबदारी मोठी आहे, त्यांच्यावरही नियमांचे बंधन असेल तर मुंबईत अधिक संख्येने नसíगक प्रसूती होईल.

* सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची गरज केव्हा भासते?

प्रसूतीदरम्यान गर्भाशयातील मूल आडवे असणे, ओटीपोट लहान असणे, मुलाला श्वास घेण्यास अडथळा असेल, गर्भाशयात मुलाची विष्ठा पसरणे या समस्या असतील तर सिझेरियन शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो.

* ही पद्धत फोफावण्याला खासगी रुग्णालये जबाबदार आहेत का?

नक्कीच. खासगी रुग्णालये अधिक रक्कम आकारण्याच्या दृष्टीने आणि नैसर्गिक प्रसूतीची गुंतागुंत टाळण्यासाठी सिझेरियनशिवाय पर्याय नसल्याचा आव आणतात. त्यात खासगी रुग्णालयात तज्ज्ञांचा अभाव असल्यामुळे महिलेकडे लक्ष देता येत नाही. त्या तुलनेत सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचा ताफा असल्यामुळे महिलेची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते. त्या तुलनेत खासगी रुग्णालयात लवकर आटोपण्याच्या दृष्टीनेही सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती करतात. अनेकदा पहिले मूल सिझेरियन शस्त्रक्रियेने झाले असल्याने दुसरेही मूल सिझेरियन करावे लागेल, असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. मात्र पहिले सिझेरियन असेल तरी दुसऱ्या प्रसूतीसाठी नैसर्गिक पद्धत योग्य ठरू शकते. अनेकदा नऊ महिने पूर्ण झाले तरी प्रसवकळा आल्या नसल्याचे सांगत सिझेरियन केले जाते. मात्र प्रत्येक वेळी नैसर्गिक पद्धतीत लुडबुड करण्याची गरज नसते. त्यामुळे स्त्री रोगतज्ज्ञांनी याबाबत जागृत राहावयास हवे. सतत सिझेरियन करीत असल्यामुळे समाजाचा याकडे कल वाढत चालला आहे.

* सिझेरियन पद्धतीमुळे मूल आणि आईला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात का?

आईबरोबरच बाळासाठीही नसíगक पद्धतीने प्रसूत होणे योग्य असते आणि यातून मूल बळकट बनते. सर्वसाधारणपणे मूल जन्मल्यानंतर पहिल्या एक तासात मुलाला आईच्या दुधाची गरज असते. मात्र सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान महिलेला भूल देण्यात आलेली असते. त्यामुळे तिला तातडीने मुलाला दूध देता येत नाही, तर शस्त्रक्रियेनंतरही अनेक तास महिला बेशुद्ध अवस्थेत असते. त्यामुळे बाळाला बाहेरचे दूध द्यावे लागते, तर सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. यादरम्यान ६०० मिलिलिटर रक्त जाते, त्यामुळे अशक्तपणा येतो. पोटावर घाव असल्यामुळे सतत वेदना होतात आणि प्रसूतीनंतरही स्तनपान करण्यास त्रास होतो.

* गर्भारपण उशिरा आल्यामुळे कोणता धोका संभवतो?

सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी उशिराचे गर्भारपण हेदेखील एक कारण आहे. वयाच्या पस्तिशीनंतर अनेक आजारांची लागण होते. मधुमेह व रक्तदाब वाढल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे वयाच्या पस्तिशीपूर्वी पहिले मूल जन्माला येणे केव्हाही चांगलेच.

– मुलाखत – मीनल गांगुर्डे