मुंबई : वंदे भारतमध्ये यानंतर रेलनीरच्या एक लिटर पाण्याची बाटलीऐवजी अर्धा लीटरची बाटली दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतून सुटणाऱ्या गांधीनगर, अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी ५०० मिलीची पाण्याची बाटली उपलब्ध असेल.

‘रेलनीर’ हा भारतीय रेल्वेचा बाटली बंद पाण्याचा ब्रॅंड आहे. मात्र ‘रेलनीर’ची बाटली एक लीटरची असल्याने ती खरेदी करणे आणि रेल्वे प्रवासात बाळगणे त्रासदायक होत होते. मात्र अनेक वर्षांपासून अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिलीची बाटलीबंद पाणी पुरवण्याची मागणी प्रवाशांकडून केली होती. तसेच रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी एक लीटर बाटलीमधील काहीसे पाणी पिऊन उर्वरित पाणी फेकून देत होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. प्रवाशांची मागणी आणि पाण्याची बचत करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अर्धा लीटर रेलनीरचा पुरवठा करण्यात येत आहे.

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून अंबरनाथ येथे बाटलीबंद आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र कारखाना आहे. या कारखान्यातून दररोज सुमारे १.७५ लाख पाण्याच्या बाटल्या तयार करण्याची क्षमता आहे. या कारखान्यात एक लीटरच्या बाटल्या तयार केल्या जातात. तसेच फक्त शताब्दी एक्स्प्रेससाठी ५०० मिलीच्या पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जात होत्या. मात्र आता वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही ५०० मिलीच्या बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत. तर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकात व उर्वरित इतर रेल्वेगाड्यांमध्ये एक लीटरची पाण्याची बाटल्यांचा पुरवठा केला जातोय.

प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईहून सुटणाऱ्या सर्व वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ५०० मिलीच्या रेलनीर बाटल्याचा पुरवठा केला जातोय. तसेच प्रवाशांनी मागणी केली असता, त्यांना दुसरी ५०० मिलीची बाटली मोफत दिली जाते. – पिनाकीन मोरावाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

हेही वाचा- महाविकास आघाडीचे अखेर ठरले! ‘हा’ पक्ष लढवणार बुलढाण्याची लोकसभा

रेल्वे मंडळाकडून आयआरसीटीसीला मुंबईतून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ५०० मिलीच्या रेलनीर पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रवाशांनी अतिरिक्त पाण्याच्या बाटलीची मागणी केल्यास त्याला अधिकची ५०० मिलीची पाण्याची बाटली कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता देण्यात यावी. दुसरी रेलनीरची बाटली मोफतच द्यावी, अशा सूचना रेल्वे मंडळाने आयआरसीटीसीला दिल्या आहेत

Story img Loader