दहिसर येथील पिठाच्या गिरणी चालकाची हातोडय़ाने हत्या केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी रमेश मधेरिया (२०)या तरुणाला अटक केली आहे. हत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 २३ नोव्हेंबर रोजी अंबिका सदन सोसायटीमधील श्रीकृष्ण फ्लोअर मिलमध्ये फुलचंद यादव यांचा मृतदेह आढळून आला होता. हातोडय़ाने वार करुन त्यांची हत्या झाली होती. तशाच प्रकारे मुंब्रा आणि कल्याण येथील पिठाच्या गिरणी चालकांच्या हत्या झाल्याने या तिन्ही हत्यांमागे एकाचाच सहभाग असल्याचा शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
रमेश हा त्याच भागातील एका दुकानात काम करतो. २३ नोव्हेंबरच्या रात्री रमेश आणि मयत यादव यांनी एकत्र मद्यपान आणि जेवण केले होते. त्यानंतर तो निघून गेला होता. त्यामुळे पोलिसांचा सुरवातीपासूनच त्याच्यावर संशय होता. परंतु २८ सप्टेंबरला कल्याण येथे आणि ४ ऑक्टोबरला अशात पद्धतीने दोन गिरणी चालकांचीही हातोडा मारून हत्या झाली होती. त्यामुळे आम्ही या तिन्ही हत्यांमागे एकच व्यक्ती असण्याची शक्यात गृहीत धरून तपास करत होतो. परंतु आता आम्ही परिस्थितीजन्य पुराव्यावरुन मधेरिया याला अटक केल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिरजादे यांनी दिली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा