नर्गिस दत्त नगरमध्ये पालिकेची कारवाई
मुंबईमधील झोपडपट्टय़ांमध्ये चारमजली झोपडय़ा उभ्या राहू लागल्या असून हे अनधिकृत मजले पालिकेला डोकेदुखी बनू लागले आहेत. मात्र पालिकेने मंगळवारी वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवरील अनधिकृत दोन आणि तीन मजले जमीनदोस्त केले. पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली.
वांद्रे येथील के. सी. मार्ग येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवर अनधिकृतपणे मजले चढविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पालिकेचे साहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी १४ झोपडय़ांवरील दोन आणि तीन मजले तोडण्यात आले. दुय्यम अभियंता के. सी. दुरटकर, पदनिर्देशित अधिकारी प्रशांत तावडे यांच्यासह १५ पालिका कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. मंगळवारी दिवसभरात १४ झोपडय़ांवरील अनधिकृत दुसरा आणि तिसरा मजला तोडण्यात आला. आणखी काही झोपडय़ांवरील अनधिकृत मजले बुधवारी तोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा