लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी सकाळपासून मालाडमधील मढ परिसरातील अनधिकृत स्टुडिओ पाडण्याची कारवाई सुरू केली. हरित लवादाकडे हे अनधिकृत स्टुडिओ पाडून टाकण्याचा निर्णय गुरुवारी दिला होता. त्यामुळे शुक्रवारी सुट्टीचा दिवस अतानाही मुंबई महानगरपालिकेने स्टुडिओवर कारवाई सुरू केली. येथील पाच स्टुडिओ जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

Maharashtra weather updates
नाशिक, नगर, पुण्यात थंडीच्या लाटेची शक्यता, जाणून घ्या, थंडीच्या लाटेची शक्यता का निर्माण झाली
African malawi mangoes
आफ्रिकेतील मलावी हापूस मुंबईत दाखल, जाणून घ्या, देशातील…
tata transformation award Indian scientists
तीन भारतीय शास्त्रज्ञांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्कार जाहीर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश
Mumbai cyber crime loksatta
मुंबई : ११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त
mumbai rape latest marathi news
मुंबई : दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक
council of architecture m arch
कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर राबविणार आता एम. आर्चची प्रवेश परीक्षा
Mumbai cyber crime marathi news
७५ वर्षीय वृद्धाची ११ कोटींची सायबर फसवणूक, नामांकीत ब्रोकरच्या नावाने बनावट मोबाइल ॲप
dadar station platform changed
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे आजपासून क्रमांक बदलले, फलाट क्रमांक ‘१०’ऐवजी ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ऐवजी ‘१०’

मढ, मार्वे, एरंगळ, भाटी येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या स्टुडिओवरून काही महिन्यांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. येथील ११ स्टुडिओ आणि २२ बंगल्यांबाबत तक्रार करण्यात आली होती. भाजपने या विषयावरून शिवसेनेला कोंडीत पकडले होते. गैरव्यवहार करून या स्टुडिओची उभारणी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. माजी मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांच्या वरदहस्तामुळे टाळेबंदीच्या काळात हे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. हा वाद पेटल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले होते.

आणखी वाचा- मुंबई: चित्रफीत वायरल करण्याची धमकी देऊन कलाकार तरूणीकडून २३ लाखांची खंडणी उकळली

मुंबई महानगरपालिकेने काही स्टुडिओवर कारवाई सुरू केली होती. मात्र काही स्टुडिओ व बंगल्यांच्या मालकांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेने कारवाई करू नये म्हणून न्यायालयातही धाव घेतली होती. या ठिकाणी तात्पुरते स्टुडिओ उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र तेथे केलेल्या पक्क्या बांधकामांवर आक्षेप घेत लवादाने ती तोडण्याचे आदेश गुरुवारी दिले. त्यामुळे महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई सुरू केली.

मढ येथील समुद्रकिनाऱ्यावर हे स्टुडिओ व बंगले उभारण्यात आले असून या ठिकाणी वेबसिरीज, चित्रपट, संगीत यांचे चित्रीकरण केले जाते. या स्टुडिओचे बांधकाम करण्यासाठी सीआरझेडची परवानगी घेणे आवश्यक होते. महानगरपालिकेने स्टुडिओला परवानगी दिली तेव्हा दर सहा महिन्यांनी सीआरझेडची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. मात्र ती परवानगी घेण्यात आली नाही व पक्के बांधकाम करण्यात आले होते.

आणखी वाचा- मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द

येथील ११ स्टुडिओ व २२ बंगल्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. मात्र ११ पैकी चार स्टुडिओ आधीच पाडून टाकण्यात आले होते. उर्वरित सातपैकी पाच स्टुडिओ पाडण्यात येणार आहेत. आणखी दोन स्टुडिओ बंगले स्वरुपात असून त्यांच्याकडे परवानगी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर २२ पैकी ३ बंगले पाडण्यात आले आहेत. १६ बंगल्यांकडे आवश्यक त्या परवानग्या आहेत. अन्य तीन बंगल्यावरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.