दिवाळी.. प्रकाशाचा, तेजाचा, मांगल्याचा सण! चकल्यांचा, लाडवांचा अन् फटाक्यांचाही सण!
महागाईचे फटके आणि फटाके, राजकीय आणि सामाजिक समस्यांची कडबोळी, भ्रष्टाचाराचं प्रदूषण असं सगळं काही पचवून आज अवघा महाराष्ट्र हा आनंदोत्सव साजरा करीत आहे.. आणि महाराष्ट्राचे मानबिंदू..
तेही यंदा गोळ्यामेळ्याने दिवाळी साजरी करीत आहेत! ही आनंदवनभुवनातली मौजचित्रं
पाहून कोणालाही प्रश्न पडावा, हे सत्य की स्वप्न?
हे खरंतर स्वप्नच. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या कोणालाही पडणारं. सत्यात यावं असं वाटणारं!  
ते सत्यात येवो, या भूमीचं गोकुळ होवो, हीच या दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रपुरुषाला प्रार्थना..
अन् सर्वाना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

Story img Loader