नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांची क्रमांक व्हॉट्सॅपवरून मिळवून त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या करणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांनी नुकतीच पुण्यातून अटक केली. आरोपीने आतापर्यंत ४० महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काही महिलांनी संकोचून तक्रारही केली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने विविध मोबाईल क्रमांकांचा वापर केला होता. त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>शिंदे गट व्हीप बजावण्याच्या तयारीत, ठाकरे गटातील आमदार अपात्र होणार? उद्धव ठाकरे म्हणाले…

तक्रारदार महिला मालाड परिसरातील रहिवासी असून तिला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आरोपीने अश्लील व्हिडिओ कॉल केला होता. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदार महिलेने याबाबतची माहिती पतीला दिली होती. त्यानंतर याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३५४(ड) व ५०९ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. त्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती घेतली असता आरोपी पुणे जिल्ह्यातील इंदोरी येथे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलिसांच्या सायबर कक्षाचे पथक पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस, पोलीस शिपाई तौसिफ शेख व पोलीस शिपाई जयंत भरारे यांनी पुण्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याने तक्रारदार महिलेला संदेश पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ज्योतीराम बाबूराव मन्सूळे(२७) अशी या तरूणाची ओळख पटली आहे.

हेही वाचा >>>दाभोलकर हत्या प्रकरण : तपास पूर्णत्वाचा अहवाल स्वीकारायचा की नाही? निर्णय घेण्यास सीबीआयला मुदतवाढ

याप्रकरणातील तपासात आरोपीने सुमारे ४० महिलांना संदेश पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी आरोपीने विविध मोबाईल क्रमांकाचा वापर केला असून अनेक महिलांना व्हॉट्सॲप कॉल व अश्लील संदेश पाठवल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.फेसबुक वापरत असताना कामाच्या शोधात असणाऱ्या अनेक महिला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होतात असे आरोपीला कळाले होते. त्यानुसार त्यानेही अशा ग्रुपमध्ये दाखल होण्यास सुरूवात केली. तेथून महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्याने अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harassment of women seeking employment mumbai print news amy
Show comments