छत्रपती शिवाजी टर्मिनसहून चेन्नईला जाणारी चेन्नई एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाडीचे इंजिन शीव रेल्वेस्थानकाजवळ दुपारी २. २०च्या सुमारास बिघडल्याने सीएसटीहून डाऊन जलद मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली. चेन्नई एक्स्प्रेसच्या इंजिनाची तातडीने दुरुस्ती केल्यानंतर २.४० वाजण्याच्या सुमारास चेन्नई एक्स्प्रेस शीव स्थानकाजवळून रवाना झाली. परंतु, त्यामुळे १५-२० मिनिटे मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली. तर दुसरीकडे ठाणे-पनवेल हार्बर मार्गावरती ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नेरूळ रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेरूळाला तडा गेल्याचे आढळून आले. रूळ बदलण्याचे काम साधारण पावणेसातच्या सुमारास पूर्ण झाले. परिणामी ठाणे-पनवेल मार्गावरची वाहतूक खोळंबली. सुमारे १५ मिनिटे उशिराने गाडय़ा धावत होत्या, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात  आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा