हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि गोवंडी या स्थानकांदरम्यान मुंबईकडे  येणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने बुधवारी लोकल सेवा कोलमडली. ऐन गर्दीच्यावेळी सकाळी सात वाजता ही घटना घडल्यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक बिघडले. या घटनेनंतर २२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्याचा परिणाम गाडय़ा सुमारे अर्धा तास उशीरा धावत होत्या. तुटलेला रुळ सांधण्यासाठी ३५ मिनिटांचा कालावधी लागला. या वेळेत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाडय़ा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अखेर सकाळी ७.३५ वाजता वाहतूक पूर्ववत झाली. या अध्र्या तासाच्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी जमली होती. सेवा पूर्ववत झाल्यानंतरही गाडय़ा २५-३० मिनिचे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हा गोंधळ दुपारी उशिरापर्यंत सुरू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा