हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठप्प झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. पनवेलहून मुंबईकडे येणा-या वाहतूकीला या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला होता. दरम्यान, मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूकही धीम्यागतीनं सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.  रेल्वे एकाच जागी बराच वेळ खोळंबल्याने अनेक प्रवाशांनी खाली उतरून पायी चालत जाणे पसंत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा