माहीमजवळ तांत्रिक बिघाड; १६ सेवा रद्द

अंधेरीपर्यंत जाणाऱ्या हार्बर मार्गावर माहीम स्थानकाजवळील क्रॉसिंग पॉइंटजवळ एका इंजिनाचा पेंटोग्राफ मंगळवारी ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे हार्बर मार्गावरून अंधेरी आणि वांद्रे येथे जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. या बिघाडामुळे तब्बल १६ सेवा रद्द करण्यात आल्या, तर हार्बर मार्गाची वाहतूक पाऊण तास उशिराने सुरू होती. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी सव्वा तास लागला.

पश्चिम रेल्वेवरील हार्बर मार्गाच्या दोन मार्गिका माहीम स्थानकाजवळून सुरू होतात. येथे रूळ एकमेकांना छेदून जातात. मंगळवारी सकाळी ११.०५च्या सुमारास येथून जाणाऱ्या एका इंजिनचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्यामुळे हे इंजिन हार्बर मार्गाच्या दोन मार्गिकांच्या मध्येच थांबले. त्यामुळे अंधेरीकडे जाणारी वाहतूक बंद पडली. त्यानंतर ३५ मिनिटांनी या मार्गावरून सीएसटीकडे वाहतूक सुरू करण्यात यश आले. मात्र अंधेरीकडे जाणाऱ्या मार्गावर इंजिन अडकून पडले होते. तब्बल एक तासानंतर, दुपारी १२.१० वाजता ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला पेंटोग्राफ सोडवण्यात आला.

Story img Loader