टपावरील तरुणाचा ओव्हरहेड उपकरणाला स्पर्श झाल्याने बिघाड
* बिघाडामुळे ३० सेवा रद्द झाल्या * ५६ सेवांचे वेळापत्रक कोलमडले.
गाडीच्या टपावरून प्रवास करणे प्रवाशांच्या जिवासाठी धोकादायक असले, तरी सोमवारी गाडीच्या टपावरून प्रवास करणारा प्रवासी सुखरूप निसटला आणि त्याच्या करामतींचा फटका हार्बर मार्गावरील लाखो प्रवाशांना बसला. या प्रवाशाचा धक्का लागून ओव्हरहेड वायर उपकरणातील एक नळी तुटली आणि हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल ४० मिनिटे रखडली. परिणामी या प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले.
सोमवारी सकाळी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडीच्या टपावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा धक्का चेंबूर ते टिळक नगर या दरम्यान ओव्हरहेड वायर उपकरणातील ‘ब्रॅकेट टय़ुब’ला लागला. ती ओव्हरहेड वायरच्या खांबाशी जोडलेली असते. या धक्क्यामुळे ती तुटली.
त्यामुळे ओव्हरहेड यंत्रणेत बिघाड झाला. सकाळी १०.३०च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. तब्बल ४० मिनिटांनंतर ही नळी तात्पुरती दुरुस्त करण्यात आली आणि त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आले.

विशेष म्हणजे या नळीला धक्का देणारा प्रवासी सुखरूप निसटला असून त्याला कोणतीही इजा झाली नाही. गाडीच्या टपावरून प्रवास करू नका, असे सांगूनही या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. प्रवाशांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी तरी स्वत:च घ्यायला हवी,
– अमिताभ ओझा, विभागीय व्यवस्थापक मध्य रेल्वे

 

Story img Loader