टपावरील तरुणाचा ओव्हरहेड उपकरणाला स्पर्श झाल्याने बिघाड
* बिघाडामुळे ३० सेवा रद्द झाल्या * ५६ सेवांचे वेळापत्रक कोलमडले.
गाडीच्या टपावरून प्रवास करणे प्रवाशांच्या जिवासाठी धोकादायक असले, तरी सोमवारी गाडीच्या टपावरून प्रवास करणारा प्रवासी सुखरूप निसटला आणि त्याच्या करामतींचा फटका हार्बर मार्गावरील लाखो प्रवाशांना बसला. या प्रवाशाचा धक्का लागून ओव्हरहेड वायर उपकरणातील एक नळी तुटली आणि हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल ४० मिनिटे रखडली. परिणामी या प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले.
सोमवारी सकाळी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडीच्या टपावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा धक्का चेंबूर ते टिळक नगर या दरम्यान ओव्हरहेड वायर उपकरणातील ‘ब्रॅकेट टय़ुब’ला लागला. ती ओव्हरहेड वायरच्या खांबाशी जोडलेली असते. या धक्क्यामुळे ती तुटली.
त्यामुळे ओव्हरहेड यंत्रणेत बिघाड झाला. सकाळी १०.३०च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. तब्बल ४० मिनिटांनंतर ही नळी तात्पुरती दुरुस्त करण्यात आली आणि त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आले.
प्रवाशाच्या ‘धक्क्या’ने हार्बर रेल्वे विस्कळीत
ओव्हरहेड वायर उपकरणातील एक नळी तुटली आणि हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल ४० मिनिटे रखडली.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-10-2015 at 06:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour railway disturbed