तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांदरम्यान ही तांत्रिक बिघाडामुळे आज संध्याकाळी सहाच्या सुमारास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे या मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Story img Loader