सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. सीवूड्स – बेलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हार्बर रेल्वेवर सकाळी पावणे दहाच्या सुमारास सीवूड्स – बेलापूर दरम्यान रुळाला तडे गेले. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या खोळंबल्या. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्ती कामात आणखी काही वेळ लागणार असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.