सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सध्या हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा ते सीएसटी या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत हा बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सध्या सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा तास उशीराने धावत आहेत. या गोंधळामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज हार्बर मार्गावर होताना दिसत आहे. त्यामुळे इजा झाला, बिजा झाला आणि आता तिजा झाला, असेच म्हणण्याची वेळ रेल्वे प्रवाशांवर आली आहे.
हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाड
सध्या सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा तास उशीराने धावत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-06-2016 at 19:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour railway trains running late