केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती सिंहनंतर तिचा पती हर्ष लिंबाचिया यालासुद्धा अटक केली. भारती सिंहच्या घरात अमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर हर्षलाही अटक करण्यात आली.

एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला. कारवाईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५ एलएसडी डॉट्स, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारतीचे नाव समोर आले.

External Affairs Minister S Jaishankar criticizes Pakistan regarding terrorism and extremism at the SCO conference
जयशंकर यांची पाकिस्तान भेट भारताच्या पथ्यावर? एससीओ परिषदेत भारताकडून कोणता संदेश?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
MS Dhoni new look photo viral
MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
A case has been registered against Munna Yadav and his two sons for assaulting the police in the police station
पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण, वादग्रस्त भाजप नेते मुन्ना यादव व त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल
rice price drop global market
भारत आणि पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातीमुळे जागतिक बाजारातील तांदळाच्या दरात घसरण; कारण काय?
Israel Attack on Iran
Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी
IPL Auction 2025 Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma
‘रोहित शर्माला कर्णधार म्हणून घ्या…’, मोहम्मद कैफने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणाला दिला सल्ला? पाहा VIDEO

त्यानंतर अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील भारतीच्या घरी आणि निर्मिती कार्यालयात एनसीबीने छापा घातला. या वेळी ८६.५ गॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष या दोघांनी गांजाचे सेवत करत असल्याचं कबूल केल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं.