Harsha Bhogale On Mumbai Traffic: जगप्रसिद्ध क्रीडा समालोचक हर्षा भोगले त्यांचा शांत स्वभावासाठी ओळखले जातत. अनेक वेळा ते लाईव्ह क्रिकेट सामन्यांचे समालोचन करताना त्यांच्या शांत आणि संयमी बोलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्घ करतात. मात्र, नुकतीच मुंबईत एक अशी घटना घडली की शांत डोक्याचे हर्षा भोगले यांना संताप अनावर झाला. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्टही केली आहे.

मुंबईत सरकारी वाहनेच…

घडले असे की, हर्षा भोगले मुंबईत प्रवास करत असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका वाहनाने रेड सिग्नल तोडत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये हर्षा भोगले म्हणाले की, “मुंबईत सरकारी वाहनेच वाहतूक नियमांचे सर्वात जास्त उल्लंघन करतात. नुकतेच मी एक बीएमसीची गाडी पाहिली जी चुकीच्या लेनमधून रेड सिग्नल तोडून जाताना पाहिली.” मध्ये चालवताना आणि लाल दिवा तोडताना पाहिली.

मुंबई ट्राफिक पोलिसांची प्रतिक्रिया

या पोस्टमध्ये हर्षा भोगले यांनी बीएमसीला टॅग करत, “जर तुम्हाला कारवाई करण्यात रस असेल तर मी तुम्हाला वाहनाचा नंबर देऊ शकतो” असे म्हटले आहे. हर्षा भोगले यांच्या या पोस्टची दखल घेत मुंबई ट्राफिक पोलिसांना त्यांच्याकडे नियम मोडणाऱ्या वाहणाची माहिती मागितली आहे.

सोशल मीडियावर संताप

दरम्यान हर्षा भोगले यांनी मुंबईतील वाहतूक परिस्थितीवर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी भोगले यांच्या पोस्टवर कमेंट करताना एक युजर म्हणाला, “हर्षा भोगले यांच्यासारखा थंड डोक्याचा व्यक्ती संतापतो तेव्हा मुंबईत रस्ते सुरक्षेची परिस्थिती किती वाईट असेल याची कल्पना करा! निष्क्रियतेबद्दल आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी शांत बसल्याबद्दल मुंबई ट्राफिक पोलिसांना धन्यवाद!”

कोण आहेत हर्षा भोगले?

हर्षा भोगले हे क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध समालोचक, लेखक आणि पत्रकार आहेत. ते क्रिकेट सामन्यांचे समालोचन करण्यासाठी ओळखले जातात. हर्षा भोगले यांची शांत आणि संयमी समालोचन शैली प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. याचबरोबर ते विविध वृत्तपत्रांसाठी क्रिकेटविषयी लेखही लिहितात. हर्षा भोगले यांच्या “The Winning Way” आणि “Behind The Shots” या पुस्तकांतून त्यांच्या क्रिकेटबद्दल असलेल्या ज्ञानाची झलक पाहायला मिळते.

Story img Loader