कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत आज (बुधवार) आमदारकीचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्यांनी पक्ष सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राजकीय निर्णयाबाबतची माहिती देण्यासाठी कन्नड येथे त्यांनी कार्यकर्त्यांची सोमवारी विशेष बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मान मिळत नाही. राजकीय विरोधकांना आघाडीच्या नावाखाली पाठबळ दिले जाते, अशी कारणे पुढे करीत त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
जाधव यांनी याआधी दोन वेळा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज ठाकरे आणि यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या आश्वासनामुळे त्यांनी पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला होता. आज अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांची भेटही घेणं टाळलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घुसमट होत आहे. वेगवेगळय़ा निर्णयांसाठी दबाव आणला जातो, असं ते जाधव म्हणाले.