मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार हसमुखभाई उपाध्याय यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गांधी विचारांचा वारसा जपणारे नेते म्हणून राजकीय क्षेत्रात त्यांचा आदराने उल्लेख केला जायचा. काँग्रेसमध्ये असताना ते कांदिवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले. राष्ट्रवादीचे प्रमुख व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. राजकारणाबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही चांगले काम केले. त्यांच्या निधनाबद्दल मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षाच्या वतीने दुख व्यक्त केले आहे.
आणखी वाचा