मुंबई : डोंबिवली एमआयडीसीतील घातक रासायनिक कारखान्यांचे अंबरनाथमधील जांभवली आणि पाताळगंगा येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याचे धोरण ठरविण्यासाठी उद्याोग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याची माहिती उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
हेही वाचा >>> बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश
डोंबिललीतील अमुदान कंपनीतील स्फोटाच्या दुर्घटनेनंतर धोकादायक सारायनिक कारखाने अन्यत्र हलविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार सामंत यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. डोंबिवलीमधील १७८ कारखान्यांचे सर्वेक्षण करून गटवारी केली जाणार असून त्यातील घातक रासायनिक कारखान्यांचे अन्यत्र स्थलांतर केले जाईल. हे करताना कारखान्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सर्व मदत केली जाईल. त्यासाठीचे धोरण निश्चित करण्यासाठी उद्याोग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आहे. समितीत पर्यावरण आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश असेल. ही समिती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अनधिकृत बांधकाम असलेल्या कंपन्यांचाही आढावा घेऊन असून तीन आठवड्यांत आपला अहवाल देईल. त्यानंतर महिनाभरात कंपन्यांच्या स्थतांतराची प्रक्रिया सुरु होईलस अशी माहिती सामंत यांनी दिली. त्यासाठी पातळगंगा व जांभवली येथे जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळे हे काम थांबले होते. मात्र आता उद्याोगांना जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, असा निर्णय बैठकीत आला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली जाणार आहे.
‘कल्हईवाले वाटलो का?’
डोंबिवली : अमुदान कंपनीतील स्फोटात आजुबाजुच्या कंपन्यांचेही नुकसान झाले. स्फोटानंतरची परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व उद्याोजक प्रयत्नशील आहेत. मात्र आता सर्वच कंपन्यांनी स्थलांतर संमतीपत्रे एमआयडीसी कार्यालयात जमा करण्याचे फर्मावल्याचा आरोप उद्याोजकांनी केला आहे. त्यावर ‘आम्ही म्हणजे कल्हईवाले वाटलो का?’ असा संतप्त सवाल केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd